बंद

    महिला व बालकल्याण विभाग

    एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. जिल्हयातील 13 तालुक्यात 22  प्रकल्प अंतर्गत 4395 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत.

     एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंगणवाडी केंद्रांमधील लाभार्थ्यांना खालील सहा सेवा देण्यात येतात-

    • अंगणवाडी केंद्रांमधील लाभार्थ्यांना पूरक पोषण आहार देण्यात येतो.
    • अंगणवाडी मधील बालकांचे लसीकरण करण्यात येते.
    • अंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते.
    • आजारी असलेल्या बालकांना संदर्भ आरोग्य सेवा देण्यात येते.
    • अंगणवाडीतील बालकांना व लाभार्थ्यांना आहार व आरोग्य शिक्षण देण्यात येते.
    • अंगणवाडीतील बालकांना अनौपचारिक शालापूर्व शिक्षण देण्यात येते.

    वरील सेवा मिळण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधवा.

    1. अंगणवाडी इमारत बांधकाम – अंगणवाडी केंद्रास स्वत :ची इमारत नसेल त्या अंगणवाडी केंद्रांचा प्रस्ताव विहीत नमुन्यात गट विकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने महिला व बाल कल्याण विभागाकडे सादर करण्यात यावा.जिल्हा वार्षिक-सर्वसाधारण योजनेतून सदरची कामे मंजूर करुन अंगणवाडी इमारत बांधकाम करण्यात येते.

    • अंगणवाडी इमारत दुरुस्ती – अंगणवाडी इमारत 10 वर्षे जुनी असल्यास व सदर इमारतीस किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असल्यास गट विकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने अंदाजपत्रकासह प्रस्ताव विहीत नमुन्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे सादर करावा.सदर दुरुस्तीची कामे जिल्हा वार्षिक-सर्वसाधारण योजनेतून मंजूर करुन करण्यात येतात.

     

    लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत महिला व बालकल्याण विभागा कडील अधिसूचित केलेल्या ऑनलाईन सेवांचा तपशील

     

    • दूरध्वनी : 020-26054299
    • पत्ता : जिल्हास्तरीय कार्यालये