Close

    वेल्हा

    तालुका लोकसंख्या – 54516
    पुरुष – 27504
    स्त्रिया – 27012
    भूगोल :
    पंचायत समिती वेल्हे ची स्थापना 1962 साली झालेली असुन वेल्हे तालुक्याचे क्षेञफळ 569.13 चौ.कि.मी. आहे. तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2560 मि मी पर्यंत आहे. गुंजवणी, आंबी, कानंद या प्रमुख नदया तालुक्यातुन वाहतात. गुंजवणी,पानशेत, वरसगाव ही धरणे आहेत. राजमाता जिजाऊ यांचे स्मारक पाल बुद्रूक येथे आहे. तसेच वेल्हे तालुक्यात मेंगाई माता मंदिर, शिरकाई माता मंदीर, मळाई देवी मंदीर, धानेश्वरजी मंदीर ईत्यादी मंदीरे तालूक्यात आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 56913 हेक्टर आहे. तालुक्याची सन 2011 च्या जणगणने नुसार लोकसंख्या 54,516 आहे. त्या अंतर्गत एकुण 124 महसूली गावे असुन, 71 ग्रामपंचायती आहेत.

    नद्या :
    गुंजवणी,आंबी, कानंद, मोसे.

    दळणवळण :
    परिवहन व खाजगी बस, भाडेतत्वावर जीप व ऑटोरिक्षा.

    पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या बसेस तालुक्यापर्यंत उपलब्ध आहेत. त्या सुटण्याचे प्रमुख ठिकाण कात्रज सर्पोदयान बसस्थानक आहे.

    पंचायत समिती अंतर्गत- एकुण 71 ग्रामपंचायती आहेत.

    जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे आहेत.

    नगरपालिका / नगर पंचायत : 00
    कॅन्टॉन्मेंट बोर्ड्स- 00
    ग्रामपंचायत- 71