भोर
तालुका लोकसंख्या -1,67,663
पुरुष- 84902
स्त्रिया- 82761
भुगोल:-
भोर तालुका हा ऐतिहासिदृष्टया महत्वाचा आणि नैसर्गिक साधन संपत्ती व सौंदर्य लाभलेला तालुका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही भोर तालुक्याची भूमी आहे. खेडेबारे,हिर्डस मावळ,गुंजन मावळ,चाळीसगाव खोरे,वीसगाव खोरे अशा भागातून आलेल्या मावळयांनी स्वराज्य उभारणी छत्रपतींच्या नेतृत्वात केली. राजगड ही स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपत घेतलेला रायरेश्वर, किल्ले रोहिडेश्वर, किल्ले केंजळगड इ. भोर तालुक्याचा भाग आहेत.
वेळवंडी नदीवर असलेला भाटघर प्रकल्प व नीरा नदीवर स्थित नीरा देवधर प्रकल्प हे पुणे जिल्हयासाठी लाभलेले वरदान आहेत.भोर तालुका सहयाद्रीच्या कुशीत वसला आहे. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.
नदया- निरा नदी,वेळवंडी नदी.
दळणवळण– भोर तालुक्यासाठी येणे– जाणे साठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एस.टी. सेवा स्वारगेट या ठिकाणावरुन उपलब्ध आहे.
पंचायत समिती – महसुली गावे – 195 असुन ग्रामपंचायती 156 आहेत.भोर नगरपरिषद – 1
पर्यटन स्थळे-
- भोर शहराचे दक्षिण बाजुस विसगाव खोरे आहे. सदर खो-यात दक्षिण डोंगरावर मांढरदेवी (काळुबाई) चे प्रसिध्द पुरातन देवस्थान आहे.
- पश्चिमेकडील डोंगरावर विचित्रगड (रोहिडेश्वर) हा शिवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. त्याचे पश्चिम बाजुस बारा मावळ खो-यापैकी हिर्डोशी मावळ हा भाग येतो. याच भागात निरा नदीचा उगम झालेला आहे. त्यावर निरा देवघर धरणाचे बांधकाम झालेले आहे.
- हिरडा व अनेक आयुर्वेदिक वनस्पती येथे मिळतात. याच खो-यात दक्षिण भागात रायरेश्वर खोरे असून, ऐतिहासिक रायरेश्वर किल्ला आहे. तेथे पुरातन महादेवाचे मंदीर आहे.
- आंबवडे येथे श्री.क्षेत्र नागेश्वर मंदीर असून मंदीर हे 17 व्या शतकामध्ये बांधण्यात आलेले आहे. संपुर्ण मंदीर हे हेमाडपंथी स्वरुपातील आहे.सन 1937 साली श्रीमंत राजा रघुनाथराव पंतसचिव यांनी ते उभारलेले आहे. या ठिकाणी झुलता पुल अस्तित्वात असून, नैसर्गिक दृष्टया आंबवडे हे उत्तम पर्यटन स्थळ आहे.