Close

    पुरंदर

    तालुका लोकसंख्या :
    १. तालुका लोकसंख्या  –  186603
    २. पुरुष   –    94876
    ३. स्त्रिया –      91727

    भूगोल :

    पंचायत समिती पुरंदरची स्थापना दिनांक 1/5/1962 रोजी झाली असुन पुरंदर तालुक्याचे क्षेञफळ 1281 चौ कि.मी. आहे.तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान496 मि.मि.आहे क-हा व चांबळी या दोन नदया तालुक्यातुन वाहतात.वीर,गराडे,माहुर,घोरवडी ही धरणे आहेत.जेजुरी व सासवड या दोन नगरपालिका आहेत.भिवडी व जेजुरी या दोन ठिकाणी हुतात्मा स्मारके आहेत.तसेच पुरंदर तालुक्यात महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाचे मंदिर श्री क्षेत्र  जेजुरी व श्रीनाथ म्हस्कोबावीर, श्री क्षेत्र नारायणपुर, कोडीत येथील श्रीनाथांचे मंदिर, मौजे बोपगाव मध्ये नवनाथापैंकी एक असलेले कानिफनाथांचे मंदिर, मौजे माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर, मौजे पांडेश्वर येथील पांडवकालीन मंदिर व मौजे वाल्हा येथील रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिक मंदिर आहे. पुणे महानगरपालिकांच्या लगतचा भाग असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 1,30,140 हेक्टर आहे. तालुक्याची सन 2011 च्या जणगणने नुसार लोकसंख्या 1,86,603 आहे.  त्या अंतर्गत एकुण 108  महसूली गावे असुन,  93 ग्रामपंचायती आहेत.

    नद्या :
    क-हा नदी , चिंबळी नदी .

    दळणवळण :
    ऑटोरिक्षा , परिवहन व खाजगी बस, भाडेतत्वावर जीप  व सायकल.

    पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या बसेस शहराच्या प्रत्येक भागामध्ये उपलब्ध आहेत. त्या सुटण्याची प्रमुख ठिकाणे –  कात्रज , हडपसर , स्वारगेट , पुणे स्टेशन, शिवाजीनगर .

    पंचायत समिती अंतर्गत एकुण 93  ग्रामपंचायती आहेत.

    जिल्हयातील नागरी प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे आहेत.

    1. नगरपालिका / नगर पंचायत : 02

    2.  ग्रामपंचायत- 93.