जुन्नर
पंचायत समिती जुन्नर
- तालुका लोकसंख्या-369806
- पुरुष लोकसंख्या –187192
- स्त्री संख्या –182614
भुगोल – जुन्नर तालुक्याचा अक्षवृत्तीय विस्तार 19.2032 अंश( उत्तर) दरम्यान आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार 73.8743 अंश – पुर्व रेखावृत्तांपर्यंत आहे. जुन्नर तालुकयाचे भौगोलिक क्षेत्र 1384.40 चौ.कि.मी आहे. जुन्नर तालुक्याचे तापमान साधारणपणे उन्हाळयात उष्ण आणि कोरडे तर पावसाळयात थंड आणि आल्हाददायक असते . जुन्नर तालुकाचे पूर्वेकडील बाजूनेही अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे. पश्चिमेकडील बाजूने ठाणे जिल्ह्याची सीमा जुन्नरला लागून आहे. जुन्नर तालुक्यात 0.21 जंगलव्याप्त क्षेत्र आहे.तसेच जुन्नर तालुक्यात 0.59 क्षेत्र ओलिताखाली आहे. जुन्नर तालुका बिबटया प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.जुन्नर तालुक्यात बिबटे, तरस,सांभर,भेकर इत्यादी प्राणी दिसुन येतात.
नदया– मिना, कुकडी,पुष्पावती, मांडवी
दळणवळण– ऑटोरिक्षा, परिवहन व खाजगी बस परिवहन महामंडळ लिमिटेड च्या बसेस तालुक्याच्या प्रत्येक भागामध्ये उपलब्ध आहेत. त्या सुटण्याची प्रमुख ठिकाणे – नारायणगावं, जुन्नर ओतुर,आळेफाटा.
जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था खालील प्रमाणे आहेत.
- नगरपालिका/ नगरपंचायत -01
- ग्रामपंचायत – 144