खेड
तालुका लोकसंख्या –
1) तालुका लोकसंख्या – 4,50,116 (2011 नुसार)
2) पुरुष – 2,37,868
3) स्त्रिया – 2,12,248
भूगोल – खेड तालुक्याचा अक्षवृत्तीय विस्तार 18 अंश 20”ते 17 अंश 20” उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार 73 अंश 50” ते 48 अंश 37” पुर्व रेखावृत्तापर्यंत आहे.खेड तालुक्याचे (पुणे) भौगोलिक क्षेत्र 1025.8 चौ.की.मी. आहे.
खेड तालुक्याचे मुख्यालय राजगुरुनगर हे क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थान आहे.खेड तालुका हा पुणे जिल्हयाच्या उत्तरेस असुन पुर्वेस शिरुर तालुका,पश्चिमेस मावळ,उत्तरेस आंबेगांव व दक्षिणेस पुणे शहर आहे.
नद्या –
भिमा,भामा,इंद्रायणी, आराळा
दळणवळण – खेड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या राजगुरुनगर बसस्थानकातुन तालुक्यातील सर्व गावांना एस.टी.महामंडळामार्फत बस सुविधा उपलब्ध् आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या बसेस तालुक्यालगतच्या भागामध्ये उपलब्ध आहेत.
पंचायत समिती अंतर्गत एकुण 162 ग्रामपंचायती आहेत.
जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे–
1)नगरपालिका / नगरपंचायत – 03 (आळंदी ,राजगुरुनगर,चाकण)
2)ग्रामपंचायत – 162
3)पर्यटनस्थळे -भिमाशंकर,आळंदी,वांद्रा,भोरगिरी, कुंडेश्वर
4)धरण – चासकमान,भामा आसखेड,कळमोडी.