शिरूर
पंचायत समिती शिरुर
शिरुर तालुका-
लोकसंख्या (जनगणना 2011 नुसार)- 3,09,009
पुरुष संख्या- 1,59,447
स्त्री संख्या- 1,49,562
भूगोल-
शिरुर तालुका हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हवेली उपविभागातील एक तालुका आहे. हे शहर घोड नदीच्या काठावर वसलेले आहे आणि म्हणूनच २० व्या शतकात ते घोडनदी म्हणूनही ओळखले जात असे. हे शहर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि शिरुर तालुका एक मुख्य व्यापारी केंद्र आहे. शिरुर हे पुणे शहरापासून 65 किमी अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन 55 किमी अंतरावर अहिल्यानगर येथे आहे. शिरुर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये पुर्व दिशेला येतो. तसेच तालुक्याची समुद्रसपाटीपासून उंची 1750 फूट इतकी आहे.
शिरुर तालुक्याचा अक्षवृत्तीय विस्तार सुमारे 18.5 अंश उत्तर ते 19.0 अंश उत्तर दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार सुमारे 74.1 अंश पूर्व ते 74.6 अंश पूर्व दरम्यान आहे. शिरुर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 1,557 चौ. किमी. आहे. शिरुर तालुका क्षेत्रफळानुसार पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्याने 9.95 टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीपायथ्याशी पुणे जिल्हा तिन भागात विभागला गेला आहे. “घाटमाथा”, “मावळ”, “देश”. शिरुर तालुका अतिशय उष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्यमानातही बदल जाणवतो. शिरुर तालुक्याच्या पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग उष्ण व कोरडा आहे.
नद्या :- भीमा, घोड, कुकडी, वेळू
दळणवळण :- ऑटोरिक्षा, महाराष्ट्र परिवहन मंडळ बस व खाजगी बस, पीएमपीएमएल बस, भाडेतत्वावर टॅक्सी व सायकल
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या बसेस शहराच्या प्रत्येक भागामध्ये उपलब्ध आहेत. त्या सुटण्याची प्रमुख ठिकाणे – जोशी वाडी शिरुर
पंचायत समिती अंतर्गत-
- ग्रामपंचायती- 96
- जिल्हा परिषद गट संख्या- 08
- पंचायत समिती गण संख्या- 16
- महसुल विभाग संख्या- 09
- महसुली गाव संख्या- 119
- प्राथमिक शाळा संख्या- 357
- अंगणवाडी संख्या- प्रकल्प 1-184, प्रकल्प 2- 178
- पाणी स्त्रोतांची संख्या- हातपंप- 1777, न.पा.पु.-134, विहीर-159
- पाझर तलावांची संख्या- 73
- प्राथमिक आरोग्य केंद्र संख्या- 08
- उपकेंद्र संख्या- 43
- ग्रामीण रुग्णालये- शिरुर, शिक्रापूर, न्हावरा, पाबळ, मलठण
- पशुसंवर्धन दवाखान्याची संख्या- श्रेणी 1-6 श्रेणी 2-5 जि.प. स्तर, श्रेणी 1-0 श्रेणी 2-13 राज्य स्तर, (तालपसचि) राज्यस्तर-1
- पशुधन संख्या- 120713
- प्रमुख पिके- ऊस, कांदा, ज्वारी, बाजरी, गहू, डाळींब
- निव्वळ पिका खाली क्षेत्र (हेक्टर)-बागायत-41125, जिरायत-79475
- सरासरी पर्जन्यमान (मि.मि.)- 450 ते 500
- रस्त्याची लांबी (कि.मी.)- ग्रामीण मार्ग-967.10, इजिमा-293.95
- साखर कारखाने- सहकारी-01, खाजगी-02
- पर्यटन/धार्मिक स्थळ- 1) छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक
2) मस्तानी कबर- पाबळ
3) मोराची चिंचोली
4) रांजणखळगे- टाकळी हाजी
- यात्रा स्थळे-
- 1) कवठे येमाई- यमाई देवी
2) वडगाव रासाई- रासाई देवी
3) रांजणगाव गणपती- महागणपती
- औद्योगिक वसाहत- रांजणगाव गणपती