बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    प्रकाशित तारीख : November 14, 2019

    उद्दिष्टे

    ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

    कार्ये

    1. एकात्मिक व शाश्वत ग्रामीण विकास धोरण 2023-28 ची अंमलबजावणी
    2. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
    3. पंचायत राज व्यवस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
    4. उत्तरोत्तर कागदरहित कार्यालये साध्य करणे आणि विभागातील प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी सुयोग्य माहिती तंत्रज्ञान साधने उपलब्ध करणे.
    5. विभागाद्वारे घेण्यात आलेल्या पुढाकारांची विविध माध्यमांद्वारे सक्रियपणे माहिती प्रदान करणे.
    6. वेळोवेळी निश्चित गेलेल्या ग्रामविकास मधील प्रमुख (फ्लॅगशिप) कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
    7. ग्राम विकास विभागातील महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी परिषदा, कार्यशाळा, ऑनलाईन परिसंवाद आणि प्रदर्शनांना प्रोत्साहन देणे.