झेडपीचे विद्यार्थी पोहोचले थेट अमेरिकेत !
झेडपीचे विद्यार्थी पोहोचले थेट अमेरिकेत !
“पुणे मॉडेल स्कूल” या पुणे जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमांतर्गत २५ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील NASA येथे अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम येथे भेट देऊन अंतराळ विज्ञानातील अनेक चमत्कार जवळून अनुभवले.
वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासास भेट देऊन भारताचे राजनैतिक अधिकारी श्री. विजय क्वात्रा यांच्यासोबतही जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला.