आंबेगाव
पंचायत समिती आंबेगाव
तालुका लोकसंख्या :
लोकसंख्या :- 2,35,972
पुरूष :- 1,19,226
स्त्रिया :- 1,16,746
भूगोल :
आंबेगाव तालुका हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हयातील शिरूर उपविभागातील एक तालुका आहे. आंबेगाव गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 70 कि.मी. अंतरावर आहे . सर्वात आदरणीय शिव मंदिरांपैकी किंवा ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यात आहे. परंतु भीमाशंकर अभयारण्यामुळे, रस्ता आंबेगाव तालुक्यातून जातो. हा तालुका सह्याद्री पर्वतरांगांच्या पूर्वेकडील पायथ्याशी आणि पुणे शहराच्या पश्चिमेकडील भागात वसलेला आहे . तालुक्याच्या प्रशासकीय सीमा उत्तरेकडील भीमाशंकर शहरांपासून दक्षिणेकडील लोणीपर्यंत आणि पूर्वेकडील पेठ ते पश्चिमेकडील कळंबपर्यंत आहेत. पावसाच्या स्वरूपामुळे हा तालुका भौगोलिकदृष्ट्या दोन भागात विभागला गेला आहे. तालुक्याच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागापेक्षा उत्तरेकडील भागात खूपच कमी पाऊस पडतो. त्याचाच एक भाग म्हणजे हा तालुक्यात २९ जुलै २०१४ साली माळीण गावात माळीण भूस्खलन झाले व त्यामध्ये जवळ जवळ २०० लोक गाडले गेले. या भूस्खलनात डोंगराच्या माती खाली पूर्ण माळीण गाव अति पाऊसामुळे गाडले गेले होते. आता हे गाव पूर्ण नविन ठिकाणी व्यवस्थित सर्व सोयी युक्त बांधून देऊन लोकांना राहावयास दिले आहे.
नद्या :
मीना, घोडनदी, वेलनदी .
या तालुक्याला वरदान ठरलेली घोडनदी वर कोल्हापूर पद्धतीने १३ बंधारे असल्यामुळे पाण्यासाठी सुलभ तालुका आहे.
धरणे:-
हुतात्मा बाबुगेनु जलाशय म्हणजेच ‘डिंबा ‘ धरण ज्याला उजवा व डावा कालवा असून त्याचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. हे धरण पाण्याच्या साठ्यासाठी मोठे धरण आहे. त्याचे बांधकाम १९९२-९३ मध्ये झाले. त्याची १३.५ टि एम सी पाणी साठयाची क्षमता आहे.
दळणवळण:
ऑटोरिक्षा , परिवहन व खाजगी बस, भाडेतत्वावर टॅक्सी व सायकल.
जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था :
नगरपरिषद:- ०१
ग्रामपंचायत:- १०३.
वनस्पती आणि प्राणि :
या तालुक्यात भिमाशंकर अभयारण्य आहे. त्यामध्ये खालील वनस्पती टिक, ओक,आंबे, यांची झाडे मिळतात.प्राण्यामध्ये ससे, हरणे, कोल्हे, लांडगा, वाघ, व चित्ता असे प्राणी मिळतात. तसेच मोर, बुलबुल, आणि पोपि हे प्राणि मिळतात. जगातील सर्वात मोठी खार म्हणजे ‘ शेखरू या जंगलात मिळते. भीमाशंकर अभयारण्य हा भाग १३१ किमी. व सह्याद्रीच्या पश्चिम घाटाचा काही भाग यात येतो. हिरड्याच्या बियाचे तेल या भागात मिळते.