Close

    मुळशी

    पंचायत समिती मुळशी

    तालुका लोकसंख्या :

    1. तालुका लोकसंख्या :- 1,71,006
    2. पुरुष :-90,053
    3. स्त्रिया :-80,953

    पंचायत समिती मुळशी (पौड), पुण्याच्या पश्चिमेला पुण्यापासुन ३५ कि.मी. अंतरावर असून तालुक्यात दुर्गम व डोंगरी भाग आहे.

    तालुक्याची भौगोलिक परिस्थिती

    एकूण भौगोलिक क्षेत्र 103953 हेक्टरपैकी, लागवडीलायक क्षेत्र 66737 हेक्टर, वहिवाटी खालील क्षेत्र २५९८७ हेक्टर, बागायत क्षेत्र ३१५१ हेक्टर, जिरायत क्षेत्र 32432 हेक्टर, जंगल (पड) क्षेत्र ३७१९४ हेक्टर.

    मुळशी तालुका डोंगरी भागात असून, तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 103953 हेक्टर आहे. तालुक्यात एकूण 143 गावे असून 92 ग्रामपंचायती आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 1688.7 मिलीमिटर आहे. चालू वर्षात सन 2024-25 मध्ये 2134.6 मिलीमिटर पडलेला आहे. मुळशी तालुक्यात कारखाने, आयटी पार्क व रहिवाशी झोन मध्ये गेल्याने प्रत्यक्ष पिकाखालील क्षेत्र कमी झालेले आहे. लोकसंख्या स्त्रीया 80,953 व पुरुष 90,053 एकूण 1,71,006 एवढी असून दारिद्रय रेषा यादी 2002 – 07 नुसार दारिद्रयरेषेखालील कुटुंबसंख्या 4264 एवढी आहे.

    मुळशी तालुक्यात मुळा, मुठा व वाळकी या नदया तर मावळ तालुक्यातील पवना नदीचा काही भाग मुळशी तालुक्यात येतो. मुळा नदीवर टाटा उद्योग समुहाने मुळशी धरण बांधले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात मुळशी, टेमघर ही धरणे आहेत. मुळशी धरणापलीकडे ५२ गावे असून पानशेत धरणापलीकडे १७ गावे आहेत. सदरची गावे संपर्काच्या दृष्टीने कठीण असून देखील मुळशी तालुका १००% हागणदारी मुक्त झाला आहे.

    तालुक्याचा पूर्व भाग पुणे शहरास लागुन असून, पश्चिमेला रायगड जिल्हा आहे. भोवताली हवेली, मावळ, वेल्हा हे तालुके आहेत. तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या ताम्हीणी घाटातुन रायगड जिल्हयात जाता येते. तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये लवासा सिटी वसलेली आहे.

    मुळशी तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला असून, भात हे प्रमुख पिक आहे. कासारसाई येथे साखर कारखाना असल्याने पूर्वभागातील शेतकरी ऊसाची शेती करतात. मुळशी तालुक्यात आंबवणे येथे अंदाजे 10,000 एकरात सर्वसोयींनी युक्त असा सहारा उद्योगसमूहाचा सदनिकांचा प्रकल्प आहे. तसेच मुठा खोऱ्यात लवासा हा त्याच धर्तीवर प्रकल्प आहे. पिरंगुट भोवतालच्या परिसरात मोठ मोठया औद्योगिक वसाहती असून, हिंजवडी येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक मानांकित उद्योग समुहाची कार्यालये आहेत, यामुळे मुळशी तालुक्याचे नांव जगाच्या नकाशावर आले आहे.

    खारावडे येथील म्हसोबा, निळकंठेश्वर येथील महादेव, ताम्हीणी येथील विंझाई माताही महत्वाची धार्मिक स्थळे असून, खारावडे येथील म्हसोबा देवस्थानास शासनाने ‘‘ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तालुक्यात छोटी मोठी बरीच पर्यटन स्थळे असून पावसाळ्यात बहुसंख्या निसर्ग प्रेमी पर्यटक मुळशी तालुक्याच्या विविध भागास भेट देत असतात.

    मुळशी तालुक्यात एकूण 92 ग्रामपंचायती असून तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे मुख्यालय पौड येथे आहे. पौड येथे 1 ग्रामीण रुग्णालय आहे. तसेच माले, माण, मुठा व आंबवणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे असून 26 आरोग्य उपकेंद्र व एक फिरता दवाखाना आहे. तालुक्यात एकूण 204 प्राथमिक शाळा व 34 माध्यमिक शाळा व 2 महाविद्यालय आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत नियमित अंगणवाडया  174 आहेत. तसेच पशुवैद्यकीय एकुण 18 दवाखाने आहेत त्यापैकी, राज्यशासनाचे 9 व जिल्हा परिषदेचे 9 आहेत. तालुक्यात एकूण 1263 महिला बचतगट आहेत. NRLM अभियान अंतर्गत पंचायत समितीस सर्व बचत गट जोडलेले आहेत. सदर जोडलेल्या गटांचे एकूण 72 ग्रामसंघ स्थापन करण्यात आलेले आहेत.

    मुळशीती लुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणेसाठी १०% लोकवर्गणीतून, “मुळशी प्रादेशिक योजना” हा नळपाणी पुरवठा महत्वाकांक्षी प्रकल्पास शासनाने मंजुरी दिली असून १००% लोकवर्गणी  जमा झाली आहे. सदर प्रकल्प कार्यरत आहे.