Close

    दौंड

    तालुक्यातील लोकसंख्या:
    पुरुष : 3,80,496
    महिला: 1,96,283

    भुगोल:
    उत्तरेला मुळामुठा, भीमा नदीचे महाकाय खोरे, त्यालाच समांतर दक्षिणेला पुणे-सोलापूर महामार्ग, मध्यभागी पुणे-सोलापूर रेल्वे मार्ग, या तिन्हींना मधोमध छेदणारा शिरूर-सातारा, राष्ट्रीय महामार्ग या तिघांमध्ये हिरव्यागार शेतीचा शालू पांघरलेला, विपुल निसर्ग संपदा लाभलेला दौंड तालुका आहे. दौंड तालुक्याचे नाव स्थानिक लोककथेनुसार, धौम्य ऋषींच्या नावावरून पडले असे मानले जाते. हा तालुका पुणे शहर, इतर भागातील पर्यटकांना आकर्षित करू पाहत आहे. अलीकडील १० वर्षांमध्ये दौंडच्या पश्चिम भागामध्ये पुणेकरांना आकर्षित करण्यासाठी ७ खासगी कृषी पर्यटन केंद्रे शेतीमध्ये साकारण्यात आली. सध्या पर्यटक या केंद्रांना भेटी देत आहेत. याशिवाय दौंडमधील महत्त्वाची तीर्थस्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि सामाजिक स्थळे पर्यटकांना खुणावत आहेत. राज्यातील मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव गणपती, थेऊर या अष्टविनायकांपैकी असणाऱ्या ४ गणपती देवस्थानचा अष्टविनायक मार्ग दौंड तालुक्यातून जातो. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढल्या आहेत. दौंड तालुक्याचे Headquarters हे दौंड शहरातच आहे. साखर उद्योग हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. तालुक्यामध्ये ८१ ग्रामपंचायती असुन १०२ महसुली गावे आहेत.

    नद्या:
    भिमा नदी, मुळा मुठा नदी.

    दळणवळण:
    रेल्वे वाहतूक दौंड रेल्वे जंक्शन: मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक.पुणे–सोलापूर, मनमाड–दौंड, आणि बारामती–दौंड या रेल्वे मार्गांचा संगम. मालवाहतूक व प्रवासी वाहतूक दोन्ही मोठ्या प्रमाणावर. लांब पल्ल्याच्या गाड्या (दिल्ली,मुंबई, हैदराबाद, नागपूर, भुसावळ इ.) येथे थांबतात. राष्ट्रीय महामार्ग (NH-65): पुणे–सोलापूर–हैदराबाद मार्ग दौंड तालुक्यातून जातो.
    राज्य महामार्ग: दौंड–बारामती, दौंड–शिरूर, खासगी व एमएसआरटी बस सेवा उपलब्ध.मालवाहतुकीसाठी ट्रक आणि टेम्पो नेटवर्क सक्षम.

    ग्रामपंचायत संख्या : एकुण ८१ ग्रामपंचायती

    तालुक्यातील इतर नागरी प्रशासन: नगरपरिषद -१

    शेती: ऊस, डाळिंब, गहु, ज्वारी, फुल, अंजीर, कांदा, कापुस,पेरु, तुर.

    साखर उद्योगाचा ठसा:
    दौंड तालुक्यामध्ये Daund Sugar Limited (Alegaon), Bhima Patas (Patas), Anuraj Sugar Limited (Yavat), Shreenath Mhaskoba Sugar (Patethan) ४ मोठे साखर कारखाने उपलब्ध आहे. तसेच तालुक्याच्या पश्चिम पट्यामध्ये गुळ उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.