Close

    बारामती

    लोकसंख्या-355839

    पुरुष – 183444

    स्त्री – 172395

    भुगोल –

    बारामती हे पुण्याच्या नैऋत्येस १८.१५ उत्तर ७४.५८ पूर्वेला दख्खनच्या पठारावर वसलेले आहे. त्याची सरासरी उंची ५३८ मीटर (१७६५ फूट) आहे.

    बारामती तालुका हा पुणे शहरापासुन 110 किमी अंतरावर असुन पुर्वेस इंदापूर दक्षिणेस फलटण  उत्तरेस दौण्ड पश्चिमेस पुरंदर हे तालुके आहेत.

    तालुक्याची लोकसंख्या सन 2011 चे जनगणनेनुसार 355839 असुन तालुक्यामध्ये एकूण 113 महसुली गांवे व 99 ग्रामपंचायती आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 138208 हे. असुन लागवडी लायक क्षेत्र 1,16,120 हे.आहे. खरीप पिकातील एकूण क्षेत्र 31,086 हे. असुन रब्बीतील क्षेत्र 9,4382 हे. आहे.बागायती क्षेत्र 59,392 हे.असुन तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान  457 मि मि.आहे.

    नदया :-

    बारामती शहरापासुन निरा डावा – निरा उजवा नदीचे पात्र जात असुन कऱ्हा व निरा यांचा संगम  सोनगांव  (बारामती ) येथे  झाला  आहे.

    दळणवळण :-

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, ऑटोरिक्षा

    पंचायत समिती अंतर्गत एकुण ग्रामपंचायत :-  99 

    तालुक्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे आहेत.

    • नगरपरिषद – 1
    • नगरपंचायत -1
    • महसुली गावे – 113
    • ग्रामपंचायत – 99